spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा परिसरातील देखील बार आणि रेस्टॉरंट बंद

खापा, १५ :  राज्य सरकारच्या नवीन मद्य धोरणाच्या निषेधार्थ,  14 जुलै रोजी, खापा शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील सर्व बार चालकांनी त्यांचे आस्थापने एक दिवसासाठी बंद ठेवून आपला संताप व्यक्त केला.

खापा मंडळ बार असोसिएशनच्या मते, सरकारने परमिट रूम व्यवसायावर लादलेला 10% व्हॅट कर, 15% नूतनीकरण शुल्क आणि उत्पादन शुल्कात 60% वाढ अन्याय्य आहे, ज्यामुळे रेस्टॉरंट्स आणि परमिट रूम व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे.

यानिमित्त खापा, बडेगाव, कोदेगाव, वाकोडी, तिघाई इत्यादी भागातील बार चालकांनी बार बंद ठेवून आपली एकता दाखवली आहे. बार चालक आणि बार व्यवस्थापक संजय राय, निखिल शेंडे, रवींद्र तुमाने, नितीन तळपल्लीवार, नयन शेंडे, विल्सन, कमलेश बिजेकर, भीमराव सोनकुसळे इत्यादींनी खापा येथील एका बारमध्ये एकत्रित येऊन या अन्याय्य धोरणाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.