spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बेला पोलिसांनी दिली ‘ ग्राम भेट’ सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन 

बेला ४ : नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांचे मार्गदर्शनाखाली बेला पोलीस स्टेशनच्या वतीने ठाणेदार चेतनसिंग चौहाण व उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी महालगाव आष्टा व रामा गावाला भेट दिली. त्यांनी सायबर गुन्हे कसे घडतात, ऑनलाइन फसवणूक कशी होते ? याबाबत सभेत मार्गदर्शन करून सावध राहण्याचे ग्रामस्थांना आवाहन केले. पोलीस अधीक्षक यांचे नेतृत्वात अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के व उपअधीक्षक दीपक अग्रवाल यांचे सूचनानुसार ठाणेदार चौहाण यांचेसह बेला पोलिसांनी विविध गावांना भेटी दिल्या. त्यांनी भेटीत आष्टा,रामा व महालगाव येथील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना सांगितल्या. सोशल मीडिया व ऑनलाइन गैरव्यवहार कसे घडतात व त्यापासून सावध कसे राहावे. याविषयी ठिक ठिकाणच्या सभेत ठाणेदार व उपनिरीक्षक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गावात अनोळखी येणाऱ्या माणसांची तात्काळ खबर पोलिसांना देण्याचे आवाहन केले. या खेडे गावांना भेट देत असताना त्यांनी ३ दारू विक्रेत्यांवर व २ जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या असून त्या आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले. यातून बेला पोलिसांनी अवैद्य धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.