spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उष्माघातापासून सावध! नागरीकांनी खबरदारी घ्यावी – डॉ शबनम खाणुनी

कामठी :- भारतीय उपखंडात मार्च महिन्यापासून उन्हाळा सुरू होतो त्यानुसार रविवारी त्याची चाहूल लागली. पहिल्याच दिवशी कामठी शहरातील नागरिकांनी उन्हाच्या तीव्र झळा सहन केल्या. सद्यस्थितीत तापमानात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. उष्माघात ही गंभीर वैद्यकीय स्थिती असून याकडे दुर्लक्ष केल्यास जीवितास धोका पोहोचू शकतो. त्यामुळे सर्व नागरीकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र च्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी केले आहे.

उष्मघात म्हणजे काय-अत्यंत उष्णतेमुळे शरीराचे तापमान अचानक वाढणे व शरीराची थंड राहण्याची क्षमता कमी होणे यालाच उष्मघात म्हणतात ही गंभीर व जीवघेणी अवस्था आहे.

उष्माघाताची लक्षणे:

– शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक

– मळमळ, उलटी, डोकेदुखी

– त्वचेचा कोरडेपणा आणि गरमपणा

– चक्कर येणे,गोंधळणे, बेशुद्ध होणे

– श्वास घेण्यास त्रास

– घाम येणे थांबणे

सावधगिरीची उपाययोजना:

दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे

भरपूर पाणी, ताक,लिंबूपाणी ,नारळपाणी प्या,पांढरे/हलके,सैल व सुती व फिकट कपडे घालावेत, डोक्यावर टोपी, ओढणी,छत्री यांचा वापर करावा तसेच डोळ्यावर गॉगल वापरावे, भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी पिण्याची सवय ठेवावी वृद्ध, लहान मुले ,गर्भवती महिला आणि आजारी व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी

उष्माघात झाल्यास प्रथमोपचार:

रुग्णाला सावलीत किंवा थंड जागी ठेवावे

कपाळावर मानेला व बगलामध्ये थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा

शरीर थंड पाण्याने पुसावे

ORS/थंड पाणी थोड्या थोड्या प्रमाणात द्यावे

रुग्ण बेशुद्ध असल्यास 108 नंबरवर कॉल करून त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी

“उष्माघात टाळा – उन्हात सावध रहा!”

“भरपूर पाणी प्या – उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करा.”

“थेट सूर्यप्रकाश टाळा – टोपी व छत्री वापरा.”

सर्व नागरिकांनी या सूचना गांभीर्याने घ्याव्यात व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच गरज पडल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.असे आवाहन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खाणुनी यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.