spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अस्वच्छता पसरविणाऱ्यांनो खबरदार !..

– नैसर्गिक जलस्त्रोतांना प्रदूषित करणाऱ्यांवर १ लाखांपर्यंतचा दंड

नागपूर :- शहरातील नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये बांधकाम व पाडकाम (सीएन्ड डी वेस्ट) कचरा, उरलेले अन्न टाकत त्यांच्या पाण्याचा प्रवाह रोखणार असाल, विना परवानगी बोरवेल सारखे कार्य करणार असाल, जुनी इमारत तोडतांना धूर उडवून वायू प्रदूषित करणार असाल,कचरा, मलबा, रेती, गिट्टी व कचऱ्याची वाहतूक करिता असताना त्या गाडीवर तरपाल टाकत नसाल, हॉटेल मध्ये डिसेलटिंग चेंबर नसल्याने परिसरात घाण पसरत असेल तर खबरदार.! उपराजधानीला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ राखण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असून, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, उपद्रवांच्या प्रकारांमध्ये जल व वायू प्रदुषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता ९ नवीन उपद्रव जोडण्यात आले आहे.

शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकास कार्य केले जात आहे. असे असताना शहरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवीन उपद्रवांच्या यादीत जल व वायू प्रदूषण करणाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई करण्यात येणार आहे, या संदर्भातील आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त श्री. राजेश भगत यांनी निर्गमित केले आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणाचा समतोल राखत आता नवीन उपद्रवांमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याकरिता विना परवानगी बोरवेल सारखे कार्य, पिठ गिरणी तत्सम व जुनी इमारत तोडतांना धूर उडवून वायू प्रदूषण करणे व इतर प्रकाराचे उपद्रवाअंतर्गत वायू प्रदूषण करणाऱ्यांकडून आता ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तसेच कचरा, मलबा, रेती, गिट्टी व कचरायाची वाहतूक करित असतांना त्या गाडीवर तरपाल न टाकणे व प्रदुषण निर्माण करणाऱ्यांकडून आता २ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. याशिवाय हॉटेल मध्ये डिसेलटींग चेम्बर नसेल, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण परसवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणाऱ्यावर आता प्रथमतः ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या गुन्हासाठी १० हजार व तिसऱ्यांदा करणाऱ्यांकडून आता २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. लग्न समारंभचे हॉल, सभागृह, कॅटरींग व हॉटेल व्यवसायीक यांनी उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांकडून आता प्रथमतः १० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या गुन्हासाठी २५ हजार व तिसऱ्यांदा करणाऱ्यांकडून आता थेट ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. शासकिय भुमीगत नाली वरील चेंबर मध्ये डेबरीज/साहित्यं/कचरा टाकून अडथडा निमार्ण करणारे तसेच इतर बांधकाम करतांना चेंबर क्षतीग्रस्तं करणे/बुझवणे/प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्यांकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तर फुटपाथवर खाद्य पदार्थ विक्री करणे, डेकोरेशनचे साहित्यं ठेवणे किंवा इतर साहित्यं ठेवून अडथळा निर्माण करणाऱ्यांकडून १ हजार रुपये प्रतिदिन प्रमाणे दंड वसूल केला जाणार आहे. मंडप उभारूण वाहतुकीस अडथडा निर्माण करणाऱ्यांकडून २ हजार रुपये प्रतिदिन प्रमाणे दंड वसूल केला जाईल. व्यक्तीक/सार्वजनिक कार्यक्रमामध्ये उरलेले अन्न किंवा व्यवसायीकाद्वारे उरलेले अन्न सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांकडून आता प्रथमतः ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या गुन्हासाठी १० हजार व तिसऱ्यांदा करणाऱ्यांकडून आता थेट २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तर नैसर्गिक जलस्त्रोता मध्ये (Eco Sensitive Zone) C&D Waste, कचरा उरलेले अन्न टाकणे व पाणी प्रवाहा ला अडथळा निर्माण करणाऱ्यांकडून प्रथमतः २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल. त्यानंतर दुसऱ्या गुन्हासाठी ५० हजार व तिसऱ्यांदा करणाऱ्यांकडून आता थेट १ लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे उपद्रव पसरविणाऱ्यांवर आता एकूण ३० उपद्रव प्रकारांमध्ये कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी देखील मनपाच्या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

Popular Articles