spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भैय्यूजी महाराज बी.एड. महिला कॉलेज येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नागपूर :- बिरसा मुंडा आदिवासी बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित युवा राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज बी.एड. (महिला) कॉलेज येथे दिनांक 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थींनी प्रतिभा चौधरी ह्यांनी उपस्थिती दर्शवली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थीनी सिमरण शेख तसेच हेमांश्री कोडपूगंटावार यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून झाली. व्दितीय वर्षीय प्रशिक्षणार्थींनी समृद्धी डंभारे यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थीनी खुशबू जोशी यांनी केले. व त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थीनी अनुश्री चिल्लावार आणि मोनाली डोमडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला. यानंतर प्रथमवर्ष प्रशिक्षणार्थी कोमल संगेवार, शामल संगेवार व ममता राठोड तसेच व्दितीय वर्ष प्रशिक्षणार्थींनी स्वाती भसारकर, स्नेहल गुल्हाने यांनी कविता सादर केली. प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थींनी पौर्णिमा काळे आणि विशाखा शेंडे यांनी गीत सादर केले. तसेच प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी पूनम कुळमेथे ,जुई गेडाम, कल्पना लोणारे, दिपीका मडावी तसेच व्दितीय वर्ष प्रशिक्षणार्थींनी वेदांती काकडे यांनी चारोळ्या सादर केल्या.द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थीनी प्रतीक्षा पांगुळ, हर्षा शेंडे व प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थींनी ऐश्वर्या कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थींनी आर्या राऊत, समृद्धी खडसे अनुजा मुदसनवार, मनिषा आत्राम, पुनम कुळमेथे, सुप्रजा रासमवार, विशाखा शेंडे, कृतिका मडावी, कल्याणी टेकाम, यांनी लघुनाट्य सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे सिमरण शेख आणि हेमांश्री कोडपूगंटावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा चौधरी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला बी.एड. प्रथम वर्षीय व द्वितीय वर्षीय प्रशिक्षणार्थींनी उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके सर, डॉ. अंशु साहू, डॉ. सुजया बिजवे, डॉ. सारिका निकम, प्रा. बालाजी राठोड, प्रा. राहुल पाईकराव, प्रा. शेखर ख्रिस्ती, प्रा. पंकज आगलावे, प्रा. जपिंदरकौर कानसे, प्रा. जान्हवी भोयर, नलिनी करपते व समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्षीय प्रशिक्षणार्थींनी तन्वी खुपाट व सारीका थोडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रतिक्षा बोबडे यांनी केले व त्यानंतर विशाखा शेंडे यांनी पसायदान घेऊन अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.