– डॉ.भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी : शेअर्स विक्री शिबिरे
तिरोडा :- द बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात (भारतीय बौद्ध महासभा ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1955 ला स्थापन केलेली रजिस्टर संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होते. बाबासाहेबांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेचे 10 उद्दिष्ट निर्माण केले होते. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर याकडे कुणाचे फारसे लक्ष नव्हते. आता या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर असून, बाबासाहेबांनी दिलेले 10 उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी डाॅ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसासटीची स्थापना केली आहे. त्या अंतर्गत बुद्धिस्ट बँक, वल्ड बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी, बुद्धिस्ट हाॅस्पिटल्स, बुद्धिस्ट इंडस्ट्रीज आदी प्रोजेक्ट्स वर काम सुरू आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर 10 उदद्दिष्टांकडे कुणाचे लक्ष नसल्याने संस्थेचे कामकाज जवळपास ठप्प असताना डॉ राजरत्न अशोक आंबेडकर यांनी या संस्थेला पुन्हा जिवंत केले. या संस्थेचे सध्या डॉ राजरत्न अशोक आंबेडकर हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या संस्थेचे 10 उद्दिष्ट असून या दहा उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट बँक निर्मिती हे असून बुद्धिष्टांची आर्थिक स्थिती सुधारावी या करता द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे डॉ .भीमराव रामजी मल्टीटेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात या बँकेची शाखा सुरू होत असताना, गोंदिया जिल्ह्यात देखील यासाठी कामकाजाला सुरुवात झाली आहे. याकरिता 4 हजारांच्याच्या जवळपास शेअर्स जमा करायचे आहेत यासाठी
बुद्धिस्ट व्यक्तींना 2610 रुपये जमा करून शेअर्स घेता येईल. त्यासाठी ही शिबिरे तिरोडा तालुक्यात देखील सुरू झाली आहेत. आज 15 बुद्दिष्ट व्यक्तीनी शेअर्स घेवून आपले नाव नोंदविलेले असून रक्कम आॅनलाईन जमा केली आहे.
आपण देखील शेअर्स खरेदी करून नाव नोंदणी करून घ्यावे. शेअर्स खरेदी करण्याकरिता वयाची अठरा वर्ष वय किमान असून व्यक्ती हा बुद्धिस्ट असला पाहिजे. सोबत शेअर्स घेताना त्याचे आधार कार्ड सुद्धा असायला हवे. ज्या बुद्धिष्ट व्यक्तींना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये शेअर्स घ्यायचे आहे, त्यांनी द बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून शेअर्स खरेदी करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तिरोडा तालुका अध्यक्ष अँड. दुर्वास रामटेके व तालुका कमिटीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.




