सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक:- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर भाजपने आता पदवीधर मतदार संघांकडे लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात मागील वेळी पक्षाला मोठा धक्का बसला होता. भाजप हा मतदार संघ पुन्हा काबीज करण्यासाठी आखणी सुरू केली आहे. पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपची रामटेक मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद नगरधन सर्कलची आढावा बैठक नगरधन येथे झाली असून अध्यक्ष तानी भाजप जिल्हा महामंत्री राहुल किरपान होते. भाजपा मंडळ अध्यक्ष योगेश म्हात्रे, माजी सभापती नरेंद्र बंधाटे, किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजेश ठाकरे पदवीधर नोंदणी विधानसभा प्रमुख अशोक हजारे यांनी मतदारापर्यंत पोहोचण्याची रणनीती मांडली. नगरधन भाजपा शाखा अध्यक्ष संजय अजबैले, पदवीधर नोंदणी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख नंदकिशोर कोहळे यांनी नोंदणीच्या आढावा सादर केला. यावेळी राजेश जयस्वाल, डॉ. विशाल कामदार, माजी सरपंच भगवान येलोरे, रवी मोहनकर, समर्थ सर, अरुणा पौनीकर, अश्विन कावळे, प्रवीण तरारे, प्रेमदास सायरे, रामेश्वर दमाहे, धनराज लिल्हारे सह बुथ प्रमुख भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








