spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यमंत्र्यांच्या हस्ते महादुला स्मशानभुमीत फळझाडांचे वृक्षारोपण

– माजी जि.प. सदस्य झाडे व बिडिओ जाधव यांची उपस्थिती

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- महादुला गट ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गट ग्रामपंचायत महादुला येथे भेट दिली व पर्यावरणावर आपले मत व्यक्त केले. दरम्यान राज्यमंत्र्यांनी येथील स्मशानभुमी मध्ये फळाच्या झाडाचे वृक्षारोपण केले. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील गट महादुला ग्रामपंचायत विविध उपक्रमाच्या माध्यमातून चर्चेत आहे. यातच राज्यमंत्र्यांनी सुद्धा येथे भेट देत वृक्षारोपण केले. याप्रसंगी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी बागडे, सरपंच शरद हेमराज डडुरे, उपसरपंच मनोज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य ओमकार काठोके, नलू सिंड्राम, पोलीस पाटील प्रदीप सोनवणे, शेषराव राहते, अर्जुन खंडाते, बंडू टेकाम, ग्रामपंचायत अधिकारी धर्मेंद्र ठवरे, सुखदेव काटोके, माजी सदस्य नितेश मरसकोल्हे, हिरामणजी सिंध्राम, सामाजिक कार्यकर्ता जयेंद्र कंगाली, रोजगार सेवक राजू कोकोडे तथा सर्व पदाधिकारी व सर्व समस्त गावकरी उपस्थित होते.

Popular Articles