– दर्शनाला हजारो भाविकांची गर्दी
मोवाड :- जलालखेडा – पांढूर्णा – नरखेड रस्त्यावरुन आत २ कि.मी अंतरावर जुन्या मोवाड गावात असलेले मोठे जागृतेश्वर महादेव मंदीर आहे. वर्धा नदिच्या तिरावर असलेल मंदीर किती जुने आहे हे अंजुन पर्यंत मोवाड वासीयांनी सांगताच आले नाही.
या जागृतेश्वर महादेव मंदिराचा भोसले कालीन इतीहास आहे. मोवाड शहर वसन्या अगोदरच शिवलिंगाची उत्पत्ती झाली होती. सुमारे ३५० – ४०० वर्षापूर्वी राजे रघुजी भोसले कालीन हे जागृतेश्वर महादेव मंदीर आहे. हे मंदिर हेमंडपथी असून ऋशीमुनी कालुरामजी तिवारी यांनी तपच्च्या करून सुमारे ४०० वर्षापूर्वी शिवलिंगाची स्थापना केली होती. मोगल काळात हे मंदिर फक्त दगडावर होते. या शिवलिंगाच्या खालुन गुप्त मार्ग होता. जुन्या काळी हे शिवलीग मोवाड गावाच्या स्मशानात होते. कालांतराने गाव वाढत गेल्याने हे शिवलिंग गावा लगात आले. कालांतराने गावात पाण्याचा दुष्काळ पडला की गावातील नागरिक पुर्ण शिवलिंग पाण्याने भरून द्यायचे. नतर गावात पाऊस पडायचा. या मंदिरात पुरातन काळा पासून तर आज पर्यत अनेक नागरिकांना नाग देवतांचे दर्शन घडायचे. तर या मंदिरात दिवसा असो की रात्री पुजा करण्यासाठी जातांनी नागरिकांना मोठी भिती वाटायची. 

मोवाड गावाची रचना होण्यापूर्वी स्मशान भुमी मध्ये वसलेल्या मंदीर म्हणून प्रख्यात ओळख आहे. या मदिराला तोडण्याचा प्रयत्न मुखल शासनात करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पण मात्र त्यांना झालेल्या चत्मकारावरून ते मंदिर तोडण्याचे सोडून पळाले. तर या मंदिराचे एक वैशिष्ट्य असे फक्त वर्षातुन एकच दिवस सुर्य किरण सकाळी शिवलिंगावर पडते.तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस त्या दिवशी सुर्योदय होत असतांना या शिवलिंगावर सुर्याच पहिल किरण पडते त्या वेळी संपूर्ण मंदीर लख लख उजेळात चमकत असल्याचे चित्र अनेक नागरिकांनी दर्शविले.
आता या मंदिराचा संपूर्ण जिर्णोधार झाला असून या मंदिरात श्रावण महिन्यात दररोज शेकडो तर सोमवारी हजारो फक्त दर्शन करतात. तर श्रावण महिना सोडला की उरवरीत अकरा महीन्यात मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी श्रद्धेने दर्शनाला येतात. मोवाड सह तालुक्यातील भाविकांन साठी हे एक रमनीय स्यळ आहे. तर श्रावण महिण्याची समाप्ती व ऋषीपंचमी च्या दिवशी हजारो च्या संख्येने नागरीक वर्धा नदीवर आंघोळीला येतात. अश्या इतिहासीक मंदीर आज पूर्णतः पर्यटन स्थळात आहे. ज्या ठिकाणी सुंदर निर्सगाचा आनंद नागरिकांना घेता येते.
‘ क ‘ नगरी तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त
इतिहासिक जुन्या मोवाड शहराला ” क ” नगरी तीर्थक्षेत्र पर्यटणाचा दर्जा शासनाने दिला आहे. या जुन्या मोवाड गावात दर वर्षाला लाखो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात. आषाढी पासून सुरु होत असलेल्या सन उत्सव ते राम नवमी पर्यंत सातत्याने चालतात . या मध्ये विशेष म्हणजे श्रावण , नवरात्र व महाशिवरात्री ला हजारो च्या संख्येने भाविक दर्शनाला येतात . मध्यप्रदेश , अमरावती जिल्हा असो या नागपूर जिल्ह्यातील एक रामनीय ठिकाण म्हणून मोवाड जुनी वस्ती कडे पाहल्या जाते. मोवाड सोन्याचे कवाड म्हणून याची ओळख आहे. जुन्या मोवाड गावाला पर्यटना चा दर्जा दिला असून आता मोवाड वासी विकास आराखडाची वाट पाहत आहे.
मंदिरला विशेष महत्व
जागृतेश्वर मोठे महादेव मंदिराला विशेष महत्व आहे. या मंदिराला वर्धा नदीचा वेढा असून वर्धा – कोल्हार नदी चा संगम आहे. मंदिराच्या गेट मधून स्मशानभुमीतील चिता पेटत दिसते त्यामुळे नाशिक जिल्हातील त्रंबकेश्वर येथे होणाऱ्या अभिषेक , कालसर्प योग , गरुडदोष , शनिदोष , नागनाथ दोष , जन्मदोष , पितृदोषासहा बाराही ग्रहाची पुजा पावन असते. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.








