spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्टार बस च्या धडकेने दुचाकीचालक शिक्षकाचा जागीच मृत्यू

कामठी :- कळमना पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-कळमणा मार्गावरील केतन रेस्टॉरंटसमोर शुक्रवारी सकाळी 7.30 दरम्यान झालेल्या भीषण अपघातात येरखेडा कामठी रहिवासी दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून मृतक शिक्षकाचे नाव निलेश मुरलीधर पारधी (वय 41) रा रामकृष्ण सोसायटी येरखेडा कामठी असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक हे सावित्रीबाई फुले प्री-कन्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या एमएच-40-एझेड-9722 क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीने पारडी येथील शाळेकडे जात असताना -कळमणा रोडवरील केतन रेस्टॉरंटसमोर नागपूर हुन कामठी कडे भरधाव वेगाने जात असलेल्या नागपूर महानगर पालिका ची लाल रंगाची स्टार बस क्र एम एच 31 एफ सी 0971 च्या चालकाने दिलेल्या भरधाव धडकेत दुचाकी चालकाला चांगलेच फरफटत नेले ज्यामुळे घडलेल्या या भीषण अपघातात दुचाकी चालक शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत मृतदेह पुढील उत्तरीय तपासनी साठी शवविच्छेदन गृहात हलविण्यात आले.मृतकाच्या पाठीमागे पत्नी व दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

या प्रकरणी मृताचे भाऊ प्रशांत मुरलीधर पारधी यांच्या तक्रारीवरून संबंधित बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत.

Popular Articles