कामठी :- कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केलेल्या खालच्या स्तरावरील व असभ्य वक्तव्याचा भाजप तर्फे तीव्र निषेध करण्यात येत असल्याची माहिती भाजप पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषद चे माजी सदस्य अनिल निधान यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीकेलेले खालच्या स्तरावरील वक्तव्य हे अत्यंत निषेधार्थ असून संपूर्ण देशाच्या सन्मानाला धक्का देणारे आहे.शिवराळ भाषा वापरून प्रसिद्धी मिळविण्याचा हा कांग्रेसचा जुना चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. सपकाळाचे वक्तव्य हे मनोविक्रुत माणसीकतेचे प्रतीक असून त्यांनी कोट्यवधी राष्ट्रभक्त भारतीयांच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत महाराष्ट्रातील जनता अश्या प्रवृत्तीला आगामी काळात योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असेही मत व्यक्त केले.
कांग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा भाजप तर्फे तीव्र निषेध -भाजप पदाधिकारी अनिल निधान









