कामठी :- ई सिगारेट विक्रीवर पूर्णपणे बंदी असल्यामुळे पोलीस आणि केंद्रिय संस्थाद्वारे बेकायदेशीर ई सिगारेट व्यवसायावर धाडी टाकल्या जात आहेत याच पाश्वरभुमीवर काल सायंकाळी 8 दरम्यान जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेताजी चौकातील एका नामवंत व्यवसायिकाच्या घरी नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी धाड घातली असता या धाडीत व घरझडत व अंगझडतीत काहीच न आढळल्याने पोलिसांना रिकाम्या हाती उलटपायी परतावे लागले ज्यामुळे कामठीत नेताजी चौकातील पोलिसांची ई सिगारेट धाडीचा फूसका बार ठरल्याच्या चर्चेला रंगत मिळाली. गुन्हे शाखा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुनी कामठी पोलिसांच्या नाकावर निंबु ठेचून नागपूर गुन्हे शाखा विभागाच्या पोलीस पथकाने काल नेताजी चौकातिल एका नामवंत घरासमोर पोलिसांची वाहन थांबवून धाड घातली असता परिसरसह कामठी शहरात एकच चर्चेचा विषय ठरला.सध्या सुरू असलेला आयपीएल क्रिकेट स्पर्धा व त्यावर बुकींचा गोरखधंदा यासंदर्भात धाड असावी या चर्चेला उधाण होते मात्र बराच वेळ पोलिसांची सुरू असलेली यंत्रना अंगझडती व घरझडतीत व्यस्त असताना परिसरात एकच चर्चेचा विषय ठरला असून पोलिसांच्या कारवाही कडे लक्ष वेधले होते मात्र बराच वेळ झालेल्या पोलिसांच्या देखरेखीत अखेर पोलीस रिकामे हात बाहेर पडले ज्यामुळे पोलिसांना मिळालेली गुप्त माहिती निष्फळ ठरली की गावपुढाऱ्यांच्या राजकीय दबावाला बळी पडून पोलीस रिकामे हात उलट पायी परतले अश्या बऱ्याच चर्चेला उधाण आहे.
कामठीत पोलिसांच्या ‘ई’ सिगारेट कारवाहीचा ठरला फुसका बार

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.


