spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी पोलीस स्टेशन वसाहत परिसरात आग

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशनच्या पोलीस वसाहत परिसरात आज पहाटे साडे चार दरम्यान अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाल्याची घटना घडली.आग लागल्याचे कारण शॉर्टसर्किट सांगण्यात येते. या आगीत पोलीस स्टेशनचा जमा मुद्देमाल असलेले दोन दुचाकी व एक तीन चाकी ऑटो जळून वाहनांचे चांगलेच नुकसान झाले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. आज पहाटे साडे चार दरम्यान या परिसरात आगीचा भडका बघून पोलिस वसाहतीत एकच तारांबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कामठी नगर परिषद चे अग्निशमन केंद्र चे अग्निशमन पथकांनी घटनास्थळ गाठून आग आटोक्यातआणण्यात यश गाठले.

Popular Articles