भाजपा शिक्षक आघाडी मौदा चा मेळावा संपन्न

0
56

किशोर साहू, मौदा :- भाजपा शिक्षक आघाडी मौदा द्वारे ‘शिक्षक मेळाव्याचे आयोजन जनता विद्यालय मौदा येथे शुक्रवार (ता.27 मार्च ) ला करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन कामठी विधानसभेचे माजी आमदार टेकचंद सावरकर आणि दक्षिण नागपूर विधानसभेचे माजी आमदार तथा नागपूर विभाग पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख सुधाकर कोहळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपा शिक्षक आघाडीचे रामटेक जिल्हाध्यक्ष अशोकराव हजारे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुकेश अग्रवाल तालुका अध्यक्ष, प्रसन्ना तिडके नगराध्यक्ष नगरपंचायत मौदा, मोरेश्वर सोरते शहर अध्यक्ष तथा नगरसेवक , मनोज चवरे पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख रामटेक लोकसभा, रमेश कुंभलकर नगरसेवक, विशेष उपस्थिती अनिल शिवणकर संयोजक पूर्व विदर्भ , अनिल मेश्राम,प्राचार्य जनता विद्यालय मौदा ,पराग सपाटे, मुकेश पटेल, संतोष बुंडे, आनंद महाले, जगन्नाथ सावरकर मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्यात भाजपा मौदा तालुका शिक्षक आघाडी व रामटेक जिल्हा शिक्षक आघाडी कार्यकारिणी ची घोषणा करण्यात आली.तसेच अनिल शिवणकर यांनी शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण केले.

या कार्यक्रमाला तालुक्यातील शेकडो शिक्षक बंधू आणि भगिनीं ची उपस्थिती होते. या मेळाव्यात पुढील प्रमाणे तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

भाजपा शिक्षक आघाडीचे तालुका संयोजक चंद्रकांत पोटभरे, सहसंयोजक, विजय चौधरी, मुकेश रामटेके, सुनील मेहर,विनेश फुलेकर संपर्कप्रमुख रवींद्र फोकसे, सह संपर्कप्रमुख भुते,सोशल मीडिया प्रमुख रविंद्र गोयले, सहसोशल मीडिया प्रमुख कैलास जाधव, प्रसिद्धी प्रमुख संजय गिरडे, सहप्रसिद्धीप्रमुख प्रशांत मोटघरे, महिला प्रमुख मनीषा राकेश,सह महिला प्रमुख मीनाक्षी कनेर, सह महिला प्रमुख स्वाती बागडे, पालक नामदेव आंबोरे, सह पालक करमचंद रोहाड, मार्गदर्शक सुधीर गजभिये, सहमार्गदर्शक विलास दंडारे सदस्यगण संतोष हटवार, उमेश वैद्य,किशोर ढोमणे, महेश तिजारे, भगवान कामरकर, अरुण वैद्य, सुजाता सिंगजुडे, राजेंद्र भुजाडे, कैलास लांडगे, महेंद्र ऊके,कार्तिक उरकुडे, दिलीप सुळके, पंकज जाधव, ऐ. डी.भोयर, शरद आमदरे, सुनील बडवाईक, नरेंद्र मुलकूमवार, इत्यादीनी तालुक्याच्या पदभार स्वीकारला.

याप्रसंगी रत्नाकर कावळे,ईश्वर पत्रे, चंद्रशेखर सावरकर, चंद्रकांत पोटभरे, यांनी मौदा तालुका नागपूर जिल्ह्यामध्ये नंबर एक करण्याचा संकल्प घेतला.