– शामादादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने स्व. प्रमिलादेवी राठोड यांना भावपूर्ण अभिवादन
पांढरकवडा प्रतिनिधी :- पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री स्व. प्रमिलादेवी राठोड यांना शामा दादा कोलाम ब्रिगेड’च्या प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंद्रे यांनी भेट देऊन भावपूर्ण श्रद्धांजली व अभिवादन अर्पण केले.
याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना इंदिरा बोंदरे म्हणाल्या की, “ज्या मातेने महाराष्ट्र राज्याला एक कार्यक्षम आणि जनसामान्यांचा मंत्री दिला, त्या मातोश्रींची कुस खऱ्या अर्थाने धन्य झाली आहे. त्यांचे संस्कार आणि कार्य सदैव स्मरणात राहील.” या अभिवादन प्रसंगी आदिवासी समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आदिवासी युवा नेते अतुल आत्राम, पुंडलिक टेकाम, सुधाकर चांदेकर यांच्यासह बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीशकुमार इंगळे, ज्येष्ठ नेते उरकुडा गेडाम आणि विजय मेश्राम सहित कोलाम समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.






