spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वरठीत घरफोडी: सव्वा दोन लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज लंपास

हंसराज,भंडारा :-  जिल्ह्यातील वरठी येथील शास्त्री वॉर्डात चोरट्यांनी बंद घर फोडून तब्बल २ लाख १३ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. ही घटना १६ मे रोजी संजय पडोळे यांच्या घरी घडली. संजय पडोळे हे आपल्या कुटुंबासह एका कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. घरातील कपाट उचकटून त्यातील सोन्याचे आणि चांदीचे मौल्यवान दागिने चोरून नेले. पडोळे कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

या प्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक अजय मडावी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.