spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांदणरस्ते अतिक्रमण मुक्त करुन दुतर्फा झाडे लावण्याची मोहिम

एकाच दिवशी १४५ पांदन रस्त्यांचे अतिक्रमण काढले

अतिक्रमण काढलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा ५ हजार ३१९ झाडांची लागवड

यवतमाळ, दि. ५  : महसूल विभागामार्फत राज्यात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होत आहे‌. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमार्फत पांदण, शिव रस्त्यांची मोजणी करून अतिक्रमण मुक्त करणे व रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे हा उपक्रम मोठ्या उत्साहात पुर्ण करण्यात आला.

शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी अवजारे, साहित्य व शेतमालाची ने आण करण्यासाठी पांदण, शिवरस्ते अतिशय महत्वाचे असल्याने सदरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची शासनाची भुमिका आहे. यासाठी दि.३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील १४५ अतिक्रमीत रस्ते मोहिम स्वरूपात शासकीय मोजणी करून अतिक्रमण मुक्त करण्यात आले.

मोहिमेत महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग व पोलिस विभाग यांनी अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी एकत्रित कार्यवाही केली. तसेच पांदण रस्ता खुला होणे हे सर्वच शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असून अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी समुपदेशन देखील करण्यात आले. पांदन रस्त्यांवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये याकरिता १४५ रस्त्यांच्या बाजूने वृक्षलागवड करण्यात आली.

जिल्ह्यातील १४५ पांदण रस्त्यांच्या दुतर्फा ५ हजार ३१९ झाडे लावण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने विविध विभागांशी समन्वय साधून सदर कार्यक्रम यशस्वी केला.

Popular Articles