spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ६९ प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

 

नागपूर, ता. ५ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार (ता.०४)  रोजी शोध पथकाने ६९ प्रकरणांची नोंद करून ५०,७००/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड)  या अंतर्गत ३५ प्रकरणांची नोंद करून १४,०००/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून ६००/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत ०७ प्रकरणांची नोंद करून २,८००/- रूपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १२ प्रकरणांची नोंद करून १२,५००/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता,फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद  करून रू.१,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २९ प्रकरणांची नोंद करून ५,८००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १४ प्रकरणांची नोंद करून रु.१४,००० /- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. वक्रतुंड उषःकाल यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.१०,०००/- चे दंड वसूल करण्यात आले.तसेच सुहास निकम यांनी सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू.5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. साई अर्णव रियालिटी यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.१०,०००/- चे दंड वसूल करण्यात आले. वेदांत सब्लोक व मे .दिव्या एक्झीबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने  प्रत्येकी रू. ५,०००/- या प्रमाणे रू.१०,०००/- चे दंड वसूल करण्यात आले.हनुमान नगर झोन अंतर्गत मे.ओमकार एनएक्स यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने  रु. ५,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच बातमवार यांनी फुटपाथवर कचरा टाकल्यामुळे रू.५,०००/- चे दंड वसुल करण्यात आले.कविता मौन्देकर यांनी   प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. सास्वत ग्रुप यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000/- रूपयांची वसुली करण्यात आली. गांधीबाग झोन अंतर्गत मे. अमर स्वीट्स यांनी रू.५,०००/-चे दंड वसूल करण्यात आले.आसीनगर झोन अंतर्गत मे.दुदानी हॉस्पिटल यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने  रु. ५,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. मंगळवारी झोन अंतर्गत संदीप विराणी यांनी फुटपाथवर तात्पुरते झोपडे उभारल्या प्रकरणी रू.५,०००/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने १२ प्रकरणांची नोंद करून रू. ७५,०००/- दंड वसूल केला.

Popular Articles