spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कॅप्टन सतीश बेलसरे यांच्या शहर विकास मंच द्वारे सत्कार

कन्हान :- यूथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवकासाठी आणि परिवारासाठी शहरात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय व्याख्याते भाविन शहा यांचे मार्मिक व्याख्यान या समाजिक उपक्रमाचे नियोजन केल्याबद्दल कन्हान शहर विकास मंच व्दारे कँप्टन सतीश बेलसरे यांचा सत्कार करण्यात आला.

शहरात पहिल्यांदाच कन्हान यूथ फाउंडेशन आणि आनंदधाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवकासाठी आणि परिवारासाठी आईये धन्यवाद करे माता – पिता का …! या विशेष कार्यक्रमाचे आयोजन शनिवार ला कुलदीप मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय व्याख्याते भाविन जे. शहा यांनी आपल्या व्याख्यानातुन आई वडिलांबाबत योग्य मार्गदर्शन करुन उपस्थित युवकांनी, पालकांना अलिंगण घालुन अश्रुच्या धारांनी भावनात्मक भावविभुर करुन आई वडिलांचे अतुट नाते असल्याचे प्रगटन केले. शहरात पहिल्यांदा झालेल्या या कार्यक्रमाची सर्वत्र कौतुक होत असल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी या समाजिक उपक्रमाचे नियोजन केल्याबद्दल रविवार ला संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये कॅप्टन सतीश बेलसरे यांच्या निवास्थानी जाऊन शाॅल आणि पुष्पगु च्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन केले. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर, मार्गदर्शक भरत सावळे, माजी मुख्याध्यापिका विशाखा ठमके, लोकेश दमाहे, अभिषेक साखरे, मुकुल शिवरकर, निखिल मेश्राम, साहिल सैय्यद, शुभम बावनकर, आयुष संतापे, अभय ऊके, रुजल मेश्राम सह सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.