मौदा :- मौदा पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा दहेगाव येथे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे मौदा पोलीस घटनास्थळी पोहचले असता, नमुद घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १) सुरेंन्द्र किष्णा आंबिलडुके, वय ३७ वर्ष, २) रामदास महादेव आंबिलडुके, वय ५८ वर्ष, ३) संजय संतोष सोमनाथे, वय ४२ वर्ष, ४) अनिल शिवदास आंबिलडुके, वय ४६ वर्ष, ५) हरिचंद्र दामाजी आंबिलडुके, वय ४५ वर्ष, ६) दिलीप रामराव आंबिलडुके, वय ३८ वर्ष, ७) जगदीश बालचंद हटवार, वय ४० वर्ष, सर्व रा. दहेगाव, ता. मौदा ८) कुंदन कंठिराम आंबिलडुके, वय ३० वर्ष, ९) सुजित टोलीराम निमजे, वय ३६ वर्ष, सर्व रा. धानला यांना जागीच पकडले. पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तास पत्ते व नगदी २९२०/- रूपये असा एकुण २९७०/-रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद ९ आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन मौदा येथे कलम १२ म जु का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



