spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विनापरवाना देशी दारू वाहतूक करणाऱ्या; आरोपीवर गुन्हा नोंद

– ५१ हजार ९२० रूपयाचा मुद्देमाल जप्त

सावनेर :- उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग, कार्यालय वेधील पोलीस अंमलदार हे अवैध धंदयावर कारवाई करणेकामी सावनेर परिसरात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अॅक्टीवा मोपेड वाहनाने अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ वार्ड क्र. १, पाटणसावंगी येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान अॅक्टीवा गाडी एम एच ४० सी एल ६७२३ ही मिळुन आली. वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता गाडीच्या डीक्कीत एका पिशवीमध्ये देशी दारू मिळुन आली. आरोपी नामे सुजल रमेश बोकडे, वय २१ वर्ष, रा. पाटणसांवगी, वार्ड क्र. १ सावनेर हा अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आला. पोलीसांनी पंचासमक्ष १) देशी दारूच्या २४ निपा किंमती १,९२०/- रूपये, अॅक्टीवा गाडी एम एच ४० सी एल ६७२३ किंमती ५०,०००/- रू असा एकुण किंमती ५१,९२०/- रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.