सावनेर :- सावनेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी गोपाल मोहन टंटेल, वय १९ वर्ष, रा. वार्ड ०९, चिचपूरा सावनेर यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०३/०३/२०२६ रोजी दुपारी फिर्यादीचे वडील हे होळी सन असल्याने लाकडे आणायला सायकल घेवून निघाले होते दुपारी ०४.०० वा. दरम्यान पांढूर्णा रोड जवळील जयस्वाल पेट्रोल पंप जवळ एका मारोती अलटो कार क एम एच ४० बी जे ३२५४ नी जोरदार धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला त्यामध्ये गंभीर दुखापत होवुन फिर्यादीचे वडील मरण पावले. आरोपी कार चालक आशिष गजानन मोहतपुरे, वय २४ वर्ष, रा. बाजार चौक, सावनेर याला दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अपघात होवुन मृत्यु होवु शकतो हे माहीती असतांना सुध्दा त्याने त्याच्या ताब्यातील कार क एम एच ४० बी जे ३२५४ दारूच्या नशेत निष्काळजीपणाने चालविल्याने सदर अपघात होवुन फिर्यादीच्या वडीलांचा मृत्यु झाला.








