spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खून व आत्महत्येच्या प्रयत्नात दोषी; आरोपीला आजीवन कारावास

एमआयडीसी बोरी :- फिर्यादी नामे अग्नी उमेस सेनवानी, वय ३५ वर्ष, रा. धर्मापुर जि. राजनांदगाव ह. मु. बिडगणेशपुर ता. हिंगणा, जि. नागपूर यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी येथे अप क्र. ८९/२०२४ कलम ३०२, ३०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद झालेला होता.

सदर गुन्हयाची हकीकत याप्रमाणे आहे की, दिनांक २६/०२/२०२४ रोजी मौजा बिडगणेशपुर एमआयडीसी बोरी येथे यातील फिर्यादी हिचे घराशेजारी राहणार आरोपी नामे रंजीत नथ्थु चौधरी, वय ४२ वर्ष, रा. पांढुर्णा जि. छिंदवाडा ह. मु. विडगणेशपुर ता. हिंगणा व मृतक नामे सुनिता सहादेव राऊत, वय ४३ वर्ष, रा. बिडगणेशपुर हिंगणा हे १० वर्षापासुन पतीपत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. यातील आरोपी याने मृतक सुनिता सहादेव राऊत हिचे सोबत पैशाच्या कारणावरून वादविवाद करून तिचा खुन केला त्यानंतर त्याने स्वतः चाकुने स्वतःचे गळयावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी आरोपीवर उपचार करून त्यानंतर त्याला सदर गुन्हयात अटक केले होते.

राजीव कर्मलवार, सहायक पोलीस निरीक्षक पोस्टे एमआयडीसी बोरी यांनी सदर प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपी विरूध्द सबळ पुराव्यानिशी दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. आज दिनाक ०४/०३/२०२६ रोजी जिल्हा व सत्र न्यायधीश ०७ अनिलकुमार शर्मा यांनी नमुद आरोपी नामे रंजीत नथ्थु चौधरी, वय ४२ वर्ष, रा. पांढुर्णा, जि. छिंदवाडा, राज्य मध्यप्रदेश यास कलम ३०२ भादंवि मध्ये आजीवन कारावास व ५,०००/- रूपये दंड, दंड न भरल्यास ०६ महिने सश्रम कारावास कलम ३०९ नुसार १ वर्ष साधा कारावास व २०००/- रू दंड, दंड न भरल्यास ०१ महिन्याचा साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.

सरकारचे वतीने ए.पी.पी. एल.बी शेंद्रे आणि वेदीका पाटील यांनी काम पाहीले. सदर खटल्याच्या सुनावली दरम्यान भाग्यश्री धिरबस्सी, उपविभागिय पोलीस अधिकारी, नागपूर विभाग, पोलीस निरीक्षक विशाल गिरी, दोषसिध्दी कक्ष, नागपुर ग्रामीण, सपोनि प्रशांत भोयर, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी, सपोनि विशांत नांदगाये, दोषसिध्दी कक्ष, नागपुर ग्रामीण यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन सफौ अनिल व्यवहारे, ब. नं. ६२० यांनी मदत केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.