कन्हान :- कन्हान पोलीस पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, बोरी सिंगोरी येथुन कन्हान कडे छोटा हाती गाडीमध्ये अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी बोरी पेट्रोलपंप जवळ नाकाबंदी केली असता टाटा एस वाहन क एम.एच. ४० सि.टी. ३८५९ मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली, त्यामध्ये रेती आढळुन आली आरोपी वाहन चालक मिलींद रनभिड लॉखाडे, वय ६२ वर्षे, रा. वार्ड क ०२ कांद्री कन्हान हा मिळुन आला. त्याला रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली. वाहन मालक आरोपी के २) प्रदीप मोहळ, रा. कांदी, कन्हान याच्या सांगणेवरून अवैधरित्या रेती वाहतुक करीत असल्याबाबत माहीती त्याने दिली.
पोलीसांनी पंचासमक्ष टाटा एस वाहन क एम.एच. ४० सि.टी. ३८५९ किमती २,५०,००० /- रूपये आणि १ ब्रास रेती किंमती २,५००/- रूपये आणि असा एकुण २,५२,५००/रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोस्टे कन्हान येथे कलम ३०३(२),४९, ३(५) भा.न्या.सं सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४. २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.