रामटेक :- रामटेक पोलीस पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या रेती ची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी नगरधन गावात जाणाऱ्या रोडवर आरोग्य विभाग केंद्रा जवळ नाकाबंदी केली असता एक ट्रॅक्टर क एम एच ४० बी जे ९२४३ आणि त्याला जोडलेली विनाकमांकाची ट्रॉली मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली. नमुद वाहनामध्ये रेती आढळुन आली. १) वाहन चालक आरोपी रितीक सोमाजी शेंद्रे, वय २५ वर्षे, रा. मुसेवाडी ता रामटेक जि नागपुर हा मिळुन आला. त्याला रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. आरोपी कं २) वाहन मालक गाते रा. चिचदा ता रामटेक, जि. नागपुर याच्या सांगणेवरून अवैधरित्या रेतीची अवैधरित्या वाहतुक करीत असल्याबाबत माहीती प्राप्त झाली.
पोलीसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर क एम एच ४० बी जे ९२४३ आणि त्याला जोडलेली विनाकमांकाची ट्रॉली आणि १.५ ब्रास रेती असा एकुण किमती ९,१०,५०० /- पयांचा मुद्देमाल जप्त केला. नमुद आरोपी यांच्या विरूध्द पोस्टे रामटेक येथे कलम ३०३(२), ३(५) भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.