spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

५२ ताशपत्त्यांच्या जुगारावर कारवाई; ५ जणांवर गुन्हा, ५०,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

मौदा :- खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा निहारवानी येथील चौकात काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे मौदा पोलीस घटनास्थळी पोहचले असता, नमुद घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १) रषीक मुर्तीदास शेंडे, वय ३२ वर्ष, रा. ठाणा पेट्रोलपंप ता. जि.भंडारा २) साहील संजय बागडे, वय २१ वर्ष, रा. फुलमोगरा ता. जि. भंडारा ३) सारंग रामलाल गोस्वामी, वय २० वर्ष, रा. अशोक नगर फुलमोगरा, ता. जि. भंडारा ४) रोहीत आलाराम सुखदेवे, वय २३ वर्ष, रा. फुलमोगरा, ता. जि.भंडारा ५) लक्की किशोर बोरकर, वय २२ वर्ष, रा. अशोक नगर फुलमोगरा, ता. जि.भंडारा यांना जागीच पकडले. दिनांक २४/०२/२०२६ रोजी मौदा पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तास पत्ते आणि रोख रक्कम ५,३००/- रूपये ०५ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमती ४५,०००/- रूपये असा एकुण ५०,३००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद ०५ आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन मौदा येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.