spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा नोंद ०४ बैल जनावरांची सुटका, जलालखेडा पोलीसांची कामगिरी

जलालखेडा :- जलालखेडा पोलीसांना माहीती प्राप्त झाली की, अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतुक केली जात आहे. अशी माहीती मिळताच पोलीसांनी सदर वाहन शोध कामी पेट्रोलींग केली असता मौजा मोवाड फाटा जलालखेडा येथे एक संशयीत पिकअप क एम पी ०४/ जी वी – २४८० हे वाहन दिसुन आले. नमूद घटनास्थळी पिकअप वाहन दिसताच त्या वाहनाला थांबवण्याचा इशारा केला असता तो भरधाव वेगाने न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न करित असता सदर वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले. वाहनाचे चालकास नाव व पत्ता विचारले असता १) चालक आरोपी नामे परवेज शाह अफसर शाह, वय २२ वर्ष, रा. आमनेर, ता. वरूड, जि. अमरावती असे सांगितले. पोलीसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ०४ बैल जनावरे मिळुन आले. नमुद जनावरांना कोणतीही चारापाण्याची सोय न करता, अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबुन, शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन वाहतुक करीत असल्याचे दिसुन आले.

पोलीसांनी पंचासमक्ष घटनास्थळावरून पिकअप क एम पी ०४/ जी बी २४८० किंमती ५,००,०००/- रूपये आणि ०४ बैल जनावरे किंमती ४०,०००/- रूपये असा एकुण किंमती ५,४०,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त केला.

Popular Articles