– महर्षि वाल्मिकी जयंती महोउत्सव समिती चे पदाधिकारी एकवटले विभागीय आयुक्तांनकडे
अमरावती :- अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील शासकीय व निमशासकीय कार्यालयांत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्याचे निर्देश द्यावेत, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे महर्षी वाल्मिकी आश्रम उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, तसेच सामदा काशीपूर येथील महर्षी वाल्मिकी मठासाठी निधी मंजूर करून वितरित करावा, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यांत जयंतीची अंमलबजावणी, अयोध्येतील आश्रम उभारणी आणि मठाच्या विकासासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर उमेश ढोणे, नगराध्यक्ष अविनाश गायगोले अंजनगाव सुर्जी नगरपरिषद, एकनाथ वावरे, प्रकाश दंदे, उमेश दंदे, कैलास खोबरखेडे, अजय पसारी आणि बंडू हांतोडकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








