किशोर साहू, मौदा :- शनिवार (ता. 12 सप्टेंबर)ला ग्रामपंचायत चाचेर येथे महानुभाव पंथाचे संस्थापक आणि थोर तत्त्वज्ञ सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांची 806 वी जयंती साजरी करण्यात आली. सरपंचा लूंबिनी महेश कलारे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच रविंद्र ठाकरे, ग्रा.पं. सदस्य शैलेश कोपरकार , पोलीस पाटील ज्ञानेश्वर नाकाडे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश काळे, माजी सरपंच महेश कलारे, क्रिष्णा खडसे, किसना नागमोते, चुडामन हुमणे, सानिदेओल काळे, देवेंद्र खडसे, राकेश काळे, सुरेश काळे, लक्ष्मण काळे,प्रल्हाद काळे, रोहित काळे,नितीन नागमोते, अमित काळे, नितीन नागमोते,उमेश झलके, रामानंद खडसे ,शेखर ठाकरे,प्रवीण मोहोळ,अंगणवाडी सेविका पुष्पा बिसने, रंजना नगरे, इंदु मनगटे व गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.





