spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धानोली मध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

किशोर साहू, मौदा :- विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी , त्यांचा शारीरिक ,मानसिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी दरवर्षी केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केंद्र शाळा धानोली मध्ये करण्यात येते. यावर्षी सुद्धा केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2025- 26 चे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धानोली येथे करण्यात आले होते. यामध्ये केंद्रातील आठ शाळांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सदस्य जि प नागपूर योगेश देशमुख तसेच सह उद्घाटक माजी पं. स. सदस्य दीपक गेडाम,अनिल बुराडे, अध्यक्ष शा. व्य. स. धानोली मनोज वाणी तसेच प्रमुख अतिथी ग्रामपंचायत धानोली सरपंच अमोल नरोले , उपसरपंच अमित तील्लीखेळे,राजेश भोयर, पोलीस पाटील प्रीती गिरी यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमा ची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर क्रीडाध्वज फडकवण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीचा विद्यार्थी भावेश लखन तिजारे उत्तम कबड्डी पटू याच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली.

केंद्रातील सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

कनिष्ठ व वरिष्ठ गटांमध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी,एकल नृत्य,समूह नृत्य, वेशभूषा,कुस्ती, धावणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्साह पूर्ण भाग घेत आपल्या कौशल्याने स्पर्धेत क्रमांक मिळवले. सायंकाळी चार वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.बक्षीस वितरण अध्यक्ष शा.व्य. स. धानोली मनोज वाणी तसेच केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख अरविंद भिवगडे, केंद्र शाळा मुख्याध्यापक कृष्णदास समरीत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी हा महोत्सव अतिशय महत्त्वाची भूमिका गाजवणारा ठरला. नियोजनबद्ध व यशस्वी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्याबद्दल केंद्रप्रमुख अरविंद देवगडे तसेच मुख्याध्यापक कृष्णदास समरीत यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Popular Articles