spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

केळापूरचा चैतन्य डहाके बनला चार्टर्ड अकाउंटंट, ग्रामीण युवकाने साधले प्रेरणादायी यश

पांढरकवडा :- पांढरकवडा आर्थिक अडचणींवर मात करत केळापूर येथील चैतन्य गणेश डहाके या तरुणाने चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्टर या पदावर कार्यरत असलेल्या वडिलांचा मुलगा असलेला चैतन्य ग्रामीण भागातून येऊनही कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. चैतन्यने आपले प्राथमिक शिक्षण केळापूर गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. पांढरकवडा येथील महिला समाज शाळेतून दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर, त्याने जिल्हा परिषद महाविद्यालयातून बारावी (विज्ञान शाखा) मध्ये ७४ टक्के गुण मिळवले. पुढील शिक्षणासाठी त्याने नागपूरचा मार्ग धरला. घरची आर्थिक परिस्थिती तशी साधी असल्याने त्याने किरायाने खोली घेऊन स्वतःच स्वयंपाक करत शिक्षण सुरू ठेवले. या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला; तरीही त्याच्या जिद्दीने आणि मेहनतीने त्याला यश मिळवून दिले. चैतन्यच्या या यशामागे त्याचे वडील पोस्ट मास्टर गणेश डहाके,आई,आजी,आजोबा,काका, काकू यांचे प्रोत्साहन आणि सुमित मंचलवार यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात लाभले. या यशामुळे केळापूर आणि परिसरात आनंदाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी चैतन्यचे अभिनंदन केले आहे.“ग्रामीण भागात राहूनही कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास असेल, तर कोणतेही स्वप्न साकार करता येते,”असे चैतन्यने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.