spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर शहर महानगरपालिका : स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका येथे गुरुवार दि. ५ मार्च रोजी पार पडलेल्या पहिल्या महासभेत स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड करण्यात आली. सभागृहातील पक्षीय संख्याबळानुसार ही निवड प्रक्रिया पार पडली.

महापौर संगीता खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनुरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रवार, उपायुक्त शेषराव टाले, नगरसचिव नरेंद्र बोबाटे तसेच सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

स्थायी समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव महासभेत मांडण्यात आला. संबंधित पक्षांच्या गटनेत्यांनी संख्याबळानुसार सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात सादर केली. त्यानंतर महापौरांनी सदस्यांची अधिकृत घोषणा केली.

यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ७,भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे ६, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित बहुजन आघाडी गटाचे २ व महानगर आघाडी गटाच्या एका सदस्याचा समावेश आहे. नवनिर्वाचित सदस्यांचे महापौर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. स्थायी समिती सभापतीपदासाठी विभागीय आयुक्त निवडणुक कार्यक्रम जाहीर करतील त्यानुसार पुढील काही दिवसात निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

१६ स्थायी समिती सदस्य –

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – राजेश मुरली अडूर,वसंत राजेश्वरराव देशमुख,चंदा मनोज वैरागड़े,संजीवनी राजु वासेकर, सचिन विनोद कत्याल,खान साफिया तवंगर खान, विनोद हरिश्चंद्र लभाने.

भारतीय जनता पार्टी,शिवसेना (शिंदे गट) महायुती – सुभाष दिनकर कासनगोट्टूवार, संजय नारायण कचर्लावार, पुष्पा संजय उराडे,सारिका सचिन संदुरकर,प्रज्वलंत प्रमोद कडू, सविता प्रलय सरकार.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व वंचित बहुजन आघाडी गट – मनस्वी संदीप गिऱ्हे, श्रुती राकेश घटे

महानगर आघाडी गट – प्रदीपशंकर देशमुख

Popular Articles