spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूरचं उत्पादन शुल्क विभाग : अलीबाबा आणि चाळीस चोरांची आधुनिक गुहा? 500 कोटी च्या वरचा भ्रष्टाचार

– कथित भ्रष्टजाळ्याची कोटींची तिजोरी उघडकीस?

चंद्रपूर :- राज्यातील मद्य विक्रीत दुसऱ्या क्रमांकाचा असणारा चंद्रपूर जिल्हा आज भ्रष्टाचाराच्या चर्चांनी अक्षरशः धुमसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दारूबंदीपासून ते परवाना वाटपापर्यंत उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत कोट्यवधींचे कथित अनियमित साम्राज्य उभे केले, अशी जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. जिल्ह्याचा इतिहास दारूबंदीपासून भ्रष्टाचारापर्यंत फिरकला… आणि शेवटी “मद्यराज्यातील मुकुटमणी – चंद्रपूर” ही उपाधी कोण देतोय हे लोकांना कळेनासं झालं आहे. स्थानिक सूत्रांचा दावा आहे की आतापर्यंत विभागातील कथित चाळीस जणांच्या गटाने, परवाना व्यवहारांपासून ते तपास, रेड, वसुली या सर्वच गोष्टींमध्ये एकजूट करून मोठी चलाख खेळी खेळली आहे.

सूत्रांनुसार अंदाज इतका धक्कादायक की— जवळपास 500 कोटींचा कथित घोटाळा! काही व्यापाऱ्यांचा उपरोध— असा आहे की, शेतकरी वर्षातून एक पीक घेतात… हे अधिकारी दिवसातून तीन भ्रष्टाचाराची पिकं घेतायत! मागील काळात एका तत्कालीन अधिकाऱ्याला एक लाखांच्या प्रकरणात कारवाई झाली होती. पण त्या प्रकरणानंतरही कथित वसुली बाजार पूर्वीपेक्षा ही जास्त ताकदीने चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असल्याचा दावा होत आहे. विभागातील काही अधिकाऱ्यांनी चंद्रपूरला ‘कमाईचं खजिना घर’ समजून मोठी बोली लावून पोस्टिंग घेतल्याची चर्चा आहे.त्यासाठी राज्यातील अनेक जण चंद्रपूर जिल्ह्यात या वसुली कोंबडीचे अंडे खाण्यासाठी सज्ज असतात.

‘अभिनंदन’ नावाच्या अधिकाऱ्याची 25 कोटींची चर्चित माया?

सूत्रांच्या माहितीनुसार, तीन वर्षांच्या काळात एका अधिकाऱ्याने तब्बल ₹25 कोटींची कथित संपत्ती चंद्रपूर जिल्ह्यातून जमा केल्याची चर्चा आहे.कोल्हापुरी अधिकारी असलेल्या या अधिकाऱ्याचा गुरु ला ACB नी लाचखोरी प्रकरणात अटक केली होती हे विशेष!

मग जनता विचारते— “हा एकजण एवढं घेतो… बाकींचा आकडा तर पानगळीच्या पानांसारखा वाढत असेल!” जिल्ह्यातील या विभागातील आजवर गाथा अनेक प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या लिहिल्या गेल्या असल्या मात्र वरिष्ठ विभागातील आर्थिक संबंधाने त्यावर आजपर्यंत पांघरून घातले. एकाच विभागात कित्येक वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सुर्वे, कांबले वर्गाने अनेक कोट्यावधीची माया या विभागातून अधिकाऱ्यांना क्लीन चिट देऊन जमवल्याचा आरोप ही होत आहे. जिल्हाधिकारी महोदय यांनी परवाना नाकारला, तरीही यांची बोली मुंबई च्या दिशेने लाचखोरी करत परवाना मंजुरीत अव्वल झाला आहे.

अलीबाबाने तरी फक्त ‘खुल जा सिमसिम’ म्हटलं होतं इथं अधिकारी ‘खुल जा वसुलीम’ म्हणताच खजिना वाहायला लागतो!

SIT अहवालाकडे राज्याचे आणि जिल्ह्याचे डोळे” आता सर्वांचं लक्ष SIT च्या अहवालाकडे लागलं आहे. तो उघड झाला तर विदर्भातील सर्वात मोठा भ्रष्टाचार कोणत्या पातळीवर आहे, हे स्पष्ट होऊ शकतं, अशी चर्चा सध्या जिल्ह्यातील त्या अहवालावर अवलंबून आहे.

चंद्रपूरच्या फाईल्स उघडल्या तर नोटा स्वतःच विचारतील— मी इथं कधी आलो? चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या सुरवातीपासूनच अनेक अधिकाऱ्यांनी वसुलीची मोहीम उघडून ठेवली होती. ज्याच्या हातात भेटेल तो त्या पद्धतीने या ठिकाणी बल्लेबाजी करत धुडगूस घालत होता. जय नावाच्या एका अधिकाऱ्याने तर छप्पर फाड कमाईचा तिजोरी साठा जमवून ठेवल्याचे चंद्रपूर जिल्ह्यात चर्चेत आहे. सागर, विकास, पाटील, अभिजित, संजय, वाट्टी, अभिचंदन, संदीप, चस्का, डोमा यांच्या सोबत अनेक लाचखोर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यां ना आणि दलालांना हाताशी घेऊन अलीबाबा चाळीस चोरांची भ्रष्टाचार करणारी टीम सज्ज केली असल्याचा आरोप होत आहे. या अधिकाऱ्यांची स्वतंत्र चौकशी जर लावली तर पाया खालची वाळूच सरखेल!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.