– लक्ष्मीनगर झोन मधील पायलेट प्रोजेक्ट यशस्वी
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा मनपा क्षेत्रातील जमिन व इमारत करता मालमत्ता कर आकारणी करीता करयोग्य मूल्य निश्चित करणेकरीता उक्त जमिन व इमारतचे रेखांक – अक्षांश नुसार ठिकाण, मालमत्तेचा वापर, इमारत असल्यास बांधकामाचा प्रकार व बांधकामाचे वय इत्यादी विचारात घेण्यात येते.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये इमारत बांधकाम क्षेत्रात होणारा विकास बघता मालमत्तेमध्ये नियमित बदल होत आहेत. मालमत्तेमधील उक्त बदला नुरुप करयोग्य मुल्य निश्चित करुन मालमत्ता कर आकारणी होणेस्तव मालमत्ता मध्ये (जमिन व इमारत) होणारे बदलाबाबत माहिती एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन लक्ष्मीनगर झोन क्षेत्रात एक पायलट प्रोजेक्ट करण्यात आला.
पायलट प्रोजेक्ट मध्ये संबंधीत एजेन्सीकडून प्राप्त सर्व्हेक्षण अहवालानुसार ९००० मालमत्तेचा डाटा प्राप्त झाला. यामध्ये २००० नवीन मालमत्ता असल्याचे व ७००० मालमत्तांमध्ये बदल असल्याचे नमूद आहे. ९००० मालमत्तांपैकी ३८० मालमत्तांकरीता मालमत्ता कर आकारणी विभाग, झोन क्र.१ च्या कर निरिक्षकांनी door to door जावून तपासणी केली असता Existing असलेला डाटा व प्रत्यक्ष मौक्यावरील डाटा हयाबाबत तुलनात्मक अहवाला वरुन असे निदर्शनास आले की, ३८० मालमत्तांपैकी १२ नवीन मालमत्ता, २१५ मालमत्ता मध्ये बदल आढळला. उक्त sample (नमूना) डाटा वरुन असे निदर्शनास आले की, मालमत्तांमध्ये दिवसें-दिवस होत असलेले बदल वेळेच्या वेळी एआय व्दारे Capture करुन मालमत्ता कर निर्धारण अद्यावत करुन घेतल्यास मालमत्ता कर आय मध्ये अधिकची भर पडून शकेल. याच धर्तीवर नागपूर महानगरपालिकेच्या दहा ही झोनच्या कार्यक्षेत्रातील मालमत्तांकरीता एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन माहिती गोळा करुन उक्त माहितीचे आधारे door to door सर्व्हे करुन घेवून मालमत्ता कर निर्धारण अद्यावत करुन घेण्याचा मानस असून यामुळे नागपूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या आय रक्कमेत निश्चितच वाढ होईल.




