spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

26 जुलै रोजी साकोली येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

हंसराज,भंडारा :-  महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत साकोली विधानसभा मतदारसंघासाठी 26 जुलै 2026 रोजी आशीर्वाद लॉन, साकोली येथे सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांचा निपटारा, विविध योजनांची माहिती तसेच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत.

साकोली परिसरातील नागरिकांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वाती देसाई, उपविभागीय अधिकारी, साकोली यांनी केले आहे.

Popular Articles