spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई :- वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या आगामी उपक्रमांच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले.

या वेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह वर्ल्ड हिंदू काँग्रेस २०२६ चे पदाधिकारी उपस्थित होते.

वर्ल्ड हिंदू काँग्रेसच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती, संस्था आणि विचारवंतांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जातो. समाजातील परस्पर संवाद, संघटन, सहकार्य तसेच विविध क्षेत्रांतील योगदानाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मुंबईत १८, १९ आणि २० डिसेंबर २०२६ या कालावधीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Popular Articles