spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठीतील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीला अभिवादन केले व आयोजित बुद्ध वंदनेत सहभाग घेतला.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उपस्थित होते.

सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ड्रॅगन पॅलेस टेंपल आज आंतरराष्ट्रीय स्थळ झाले आहे. आता ड्रॅगन पॅलेसची जगभरात ओळख निर्माण होत आहे. परदेशातूनही अनेक नागरिक येथे येऊन बुद्धवंदनेत सहभागी होत असतात. नागपुरात आल्यावर प्रत्येकाची ड्रॅगन पॅलेस टेंपलला भेट द्यायची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.