spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदानाबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसन

गडचिरोली :- गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. याचवेळी ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिराला अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नागेश शाहू यांनी रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानासाठी पात्रता, रक्तसंकलनाची प्रक्रिया, रक्ताची सुरक्षितता व साठवणूक याबाबत मार्गदर्शन केले. रक्तदानानंतर अशक्तपणा येतो का, कोण रक्तदान करू शकते, कोणत्या परिस्थितीत रक्तदान टाळावे आणि रक्ताची सुरक्षितता कशी राखली जाते, अशा नागरिकांच्या विविध प्रश्नांचे त्यांनी शास्त्रीय माहितीच्या आधारे निरसन केले.

रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नसल्याने अपघातग्रस्त, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज असलेल्या माता, थॅलेसेमियाग्रस्त बालके तसेच शस्त्रक्रियेतील रुग्णांसाठी स्वेच्छा रक्तदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. ‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून जनजागृती आणि प्रत्यक्ष सामाजिक कृतीची सांगड घालत पात्र नागरिकांनी स्वेच्छा रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.