spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्व.चंद्रकलाबाई महादेवराव ढोणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लहान मुलांसाठी रंगभरणं स्पर्धेचे आयोजन

अमरावती :- स्व. चंद्रकलाबाई महादेवराव ढोणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त लहान मुलांसाठी रंगभरणं स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये खालील नावे नमूद लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सहभागी झालेल्या सर्व मुलांच्या चित्रांचे योग्य व निष्पक्ष मूल्यमापन करण्यात येणार असून त्यातून मेरिट क्रमांक १, २ व ३ निवडण्यात येणार आहेत. निवड झालेल्या विजेत्या मुलांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र (Certificate) देऊन गौरविण्यात येणार आहे.

लहान मुलांच्या सृजनशीलतेला, कल्पकतेला व कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रंगभरणं स्पर्धेच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी विविध सामाजिक संदेश देण्यात आले.

त्यामध्ये —

१) आपण आरोग्याची काळजी घ्या, समृद्ध भारत देशाचे वाटेकरी व्हा,

२) बेटी बचाव बेटी पढाव,

३) आपले घर व परिसर स्वच्छ तर शहर स्वच्छ,

४) आपण सुधारलो तर देश सुधारेल

असे महत्त्वाचे संदेश स्पर्धेच्या पत्रिकेद्वारे लहान मुलांपर्यंत पोहोचवण्यात आले.

या उपक्रमात ईशिका, ॲडविल, समर्थ, रागवी, हृदया, रियान्श, अन्विका, शौर्य, शिवा, अनुष्का, वैष्णवी, हर्ष, हर्षाली, सार्थक, आराध्या, अवनीश, साई, कुणाल, शरांश, साहिल अली, तन्वी, सर्वेश, योगेश, खुशी, मिताली, समर्थ आदी मून फेज कोचिंग क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

हा सामाजिक उपक्रम आयोजक प्रा. कमल (MA, B.Ed) व सुषमा (BA, B.Ed) व संपूर्ण ढोणे परिवार यांच्या नियोजनातून यशस्वी होत आहे.

Popular Articles