spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रीय किसान सन्मान दिन उत्साहात साजरा

– वस्त्रोद्योग मंत्रालया अंतर्गत कस्तुरी कॉटन उत्पादनास चालना

नागपूर :- भारताचे माजी पंतप्रधान स्व.चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त २३ डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान सन्मान दिनाचे आयोजन भारतीय वस्त्रोद्योग महासंघ (CITI CDRA) आणि कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रशिक्षण संस्था (CIRCOT), यांच्या संयुत्क विद्यमाने नागपूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाला कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ.अरविंद वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, विदर्भ कापूस असोसिएशनचे अध्यक्ष भावेश शहा, झायडेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रादेशिक प्रमुख शुभम ढोणे, टेक्सप्रोसीलचे सहायक संचालक अक्षय बुचडे, CIRCOTचे प्रमुख डॉ.के.पांडियन यांच्यासह CITI-CDRA महाराष्ट्रचे प्रकल्प समन्वयक जी.एच.वैराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. वस्त्रोद्योग मंत्रालया अंतर्गत कस्तुरी कॉटन उत्पादनास चालना देण्यासाठी कापुस उत्पादकांना प्रोत्साहित करण्यात आले. या कार्यक्रमास कापूस उत्पादक शेतकरी, कापूस जिनिंग प्रतिनिधी, संशोधन संस्था तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिघन लागवड पद्धतीद्वारे उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये निंबाळकर, राजेंद्र उडान, सुधा कोटलकार आणि ओमकार विटले यांचा समावेश होता. गोविंद वैराळे यांनी उच्च घनता लागवड प्रणाली (HDPS) आणि अतिरिक्त लांब धाग्याच्या (ELS) कापूस लागवडी बाबत क्षेत्रीय अनुभव मांडले. सांगली जिल्ह्यात नुझीवेडू सीड्सच्या सहकार्याने शेतकऱ्यांना प्रति एकर १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र मनोहरे यांनी शेतकऱ्यांना शाशकीय योजनानचा फायदा घेण्याकरिता मार्गदर्शन केले. कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ.ए.एल.वाघमारे यांनी कापूस विकासासाठी धोरणात्मक व संस्थात्मक पाठबळाचे महत्त्व स्पष्ट करत विविध विभागांमधील समन्वयातून HDPS तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यावर भर दिला. अक्षय बुचाडे यांनी वस्त्रोद्योग मंत्रालया अंतर्गत कस्तुरी कॉटन ब्रांड उत्पादनाचे फायदे विषद केले. हा कार्यक्रम CITI- CDRA नागपूरचे प्रकल्प अधिकारी युगान्तर मेश्राम, वर्धा व सांगली जिल्ह्यांचे प्रकल्प अधिकारी अमित कावडे आणि संपूर्ण टीमच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला. CITI-CDRA महाराष्ट्रचे प्रकल्प अधिकारी जगदीश नेरलवार यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.

Popular Articles