spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मल्हारी बुवा काळे पुण्यतिथी,अटल बिहारी वाजपेयी जयंती रक्तदान शिबीराने साजरी

कन्हान :- अखिल भारतीय मागं गारोडी दलित आदि वासी भटके संघर्ष समिती व्दारे झेंडा चौक विष्णु – लक्ष्मी नगर, वाघधरेवाडी कन्हान येथे मल्हारी बुवा काळे यांची पुण्यतिथी आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती रक्तदान शिबीराने साजरी करण्यात आली.

राष्ट्रीय किर्तनकार मल्हारी बुवा काळे (लातुर) हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेड कर, महात्मा गांधी, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचे गाढे अभ्यासक असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासना व्दारे महात्मा जोतीबाफुले समाजधीश पुरस्कार, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार प्राप्त किर्तनकार मल्हारी बुवा काळे यांच्या पुण्यतिथी निमित्य अखिल भारतीय मागं गारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती व्दारे झेंडा चौक विष्णु-लक्ष्मी नगर, वाघधरेवाडी कन्हान येथे मा. मल्हारी बुवा काळे व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला कन्हान नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, नगरसेवक शक्ति पात्रे, केतन भिवगडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रक्त दान शिबीराचे डॉ. सुंदरलाल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून किर्तनकार मल्हारी बुवा काळे यांच्या पुण्यतिथीला तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्य अभिवादन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत बहु संख्येने रक्तदा त्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. लाईफ लाईन ब्लड बँक नागपुरचे डॉ. अविनाश बाबरे व वैद्यकीय चंमु सुशिल मेश्राम, हरिश ठाकुर, वैभव लोहकरे, वैष्णवी गुनाडे, निशा मरकाम, नरेश टोनपे आदी चंमुने रक्त संकलन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेवालाल पात्रे यांनी तर आभार सतिश नाडे हयांनी मानले.

कार्यक्रमाच्या यश स्वितेसाठी किरण पेटारे, अर्जुन पात्रे, भुरा पात्रे, अरुण खडसे, किशोर शेंडे, अमर पात्रे, होमराज लोंढे, किंमत पात्रे, सतिश शेंडे, आदित्य पात्रे, अनिल भालेकर, अश्विन इंचुलकर, छिया खडसे, सिद्धार्थ पात्रे, नरसिंहा गायकवाड, आशिष इंचुरकर, दीपक पुरवले, चंदन पात्रे, देवचंद गायकवाड, प्रियांशु वाघमारे, रेहान पात्रे, सुमित पुरवले, दीपक हातागळे, विजय गायकवाड, रवि रोकडे आदीनी अथक परिश्रम घेतले. या सामाजि क उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन, अशा उपक्रमां मुळे समाजात आरोग्य व सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जात असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Popular Articles