spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी कटिबद्ध- मंत्री जयस्वाल.

रामटेक 30 :- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे शाळा प्रवेशोत्सव व पालक-बालक मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री ऍड. आशिष जयस्वाल उपस्थित राहून बालमित्रांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नवीन इमारतीच्या चांगल्या कामाचे कौतुक केले व काही सूचनाही केल्या. सरकारी बांधकामांचा दर्जा उत्तम व्हावा यासाठी आपण कायम आग्रही असतो आणि त्यामुळेच रामटेकमधील सर्व सार्वजनिक बांधकामे व रस्ते यांचा दर्जा उत्तम आहे. आदिवासी आश्रमशाळांमधील शैक्षणिक व्यवस्थेला अधिक सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी विद्यार्थी-केंद्रीत दृष्टिकोनास प्राधान्य देण्यात येणार आहे. या आश्रमशाळेला निधीची तरतूद कमी पडू देणार नाही. शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. संगणकीय शिक्षणासारख्या आधुनिक कौशल्यांचा दर्जेदार पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उद्या शहरात गेले, तरी ते कुठेही कमी पडता कामा नये, यासाठी योग्य मार्गदर्शन आणि कौशल्यांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी देशाचे भविष्य म्हणून महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा शिक्षणातून घ्यावी. ज्ञान, संस्कार आणि सेवाभाव यांची सांगड घालणाऱ्या शिक्षणपद्धतीची गरज आज अधिक भासते असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला सरपंच  भांडारकर, माजी जिल्हापरिषद सदस्या  शांताताई कुमरे, आकाश पंधरे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Popular Articles