spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आयटीआय प्रशिक्षकांच्या राज्यस्तरीय TOT प्रशिक्षणाचा समारोप

– कौशल्य विकासासाठी प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची – मंत्री मंगल प्रभात लोढा

नागपूर :- संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्रद्धानंद पेठ येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालया मार्फत आयोजित राज्यस्तरीय TOT (Training of Trainers) प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप रविवारी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

यावेळी माजी कुलगुरू डॉ. चांदेकर, आयएमसी अध्यक्ष गिरीश देशमुख, सहसंचालक पी.टी.देवतळे, उपसंचालक हेमंत आवारे, उपसंचालिका एस.एस.कुलकर्णी, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी पी.जी.ठाकरे, व 6 विभागामधील 40 शिल्प निदेशक (TOT)ट्रेनिंग करता उपस्थित झाले होते तसेचASEF, TDM,फिटर, व्यवसायातील राज्यभरातील शिल्प निदेशक या ट्रेनिंग करता उपस्थित होते.

मंत्री लोढा यांनी सांगितले की, राज्यातील सहाही प्रादेशिक विभागांतील प्रशिक्षकांना या प्रशिक्षणाद्वारे आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाभिमुख अध्यापन आणि कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्यात आले. २० टक्के सैद्धांतिक आणि ८० टक्के प्रात्यक्षिक प्रशिक्षणामुळे आयटीआयमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणादरम्यान आधुनिक यंत्रसामग्री, उद्योगभेटी, अध्यापन पद्धती व मूल्यांकन प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल मंत्री लोढा यांनी संस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश केने यांनी तर आभार उपसंचालिका एस.एस.कुलकर्णी यांनी मानले. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सहदेव चव्हाण यांनी दिली.

Popular Articles