spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

7 Notes Entertainers तर्फे ‘सुरों की महफिल’ उत्साहात; ‘द नेक्स्ट व्हॉइस – विदर्भस्तरीय सोलो सिंगिंग स्पर्धा 2026’ची भव्य घोषणा

नागपूर :-  7 Notes Entertainers च्यावतीने आयोजित ‘सुरों की महफिल’ हा संगीताचा बहारदार कार्यक्रम अजनी चौक, वर्धा रोड येथील हॉटेल के.पी.इन येथे उत्साहपूर्ण संपन्न झाला. या कार्यक्रमाला शहरातील संगीतप्रेमी, गायक-कलाकार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे, प्रमुख अतिथी वृंदा ठाकरे तसेच विशेष अतिथी हर्षा चौधरी आणि रवी हातेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी 7Notes Entertainers च्या या उपक्रमाचे कौतुक करत नवोदित संगीत प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचे अभिनंदन केले. यावेळी ‘द नेक्स्ट व्हॉइस – विदर्भस्तरीय सोलो सिंगिंग स्पर्धा 2026’ ची अधिकृत घोषणा करण्यात आली. स्पर्धेचा उद्देश, नियमावली, नोंदणी प्रक्रिया, आकर्षक बक्षिसे तसेच स्पर्धकांना मिळणाऱ्या विविध संधींची सविस्तर माहिती उपस्थित कलाकार व संगीतप्रेमींना देण्यात आली. कार्यक्रमा दरम्यान विविध गायक- कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन अँकर ओमप्रकाश साहू यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन 7 Notes Entertainers चे संचालक व आयोजक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आयोजक राहुल वहाने यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात कोअर टीममधील विनोद बोबडे, प्रमोद जोंधळे, तृप्ती पाटील, संजय आंबादे, संजय खोब्रागडे, हेमा नागोसे, साधना भुजाडे, ॲड. अर्चना आणि ममता ठवरे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, कलाकार, सहकारी आणि उपस्थित संगीतप्रेमींचे आभार मानण्यात आले. तसेच अधिकाधिक इच्छुक गायकांनी ‘द नेक्स्ट व्हॉइस -विदर्भस्तरीय सोलो सिंगिंग स्पर्धा 2026’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

Popular Articles