spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

…अखेर खापरखेडा (तेली )ते पारडीखुर्द पर्यायी पूल वाहल्यामुळे बंद असलेली वाहतूक रविवार पासून सुरू

– सनरायझर्स कन्स्ट्रक्शन कंपनीचे वाहनधारकांनी मानले आभार

किशोर साहू, मौदा :- तीन दिवसांपूर्वी सुरू असलेल्या सततधार पावसाने खापरखेडा (तेली) ते पारडीखुर्द दरम्यान नाल्यावरील पर्यायी पूल बुधवार ( ता.22 जुलै)ला वाहून गेलेला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद होती. दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने संबंधित कंत्राटदाराने वाहलेला पर्यायी पूल दुरुस्त करण्यासाठी व जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे शेवटच्या टप्प्यावरील बांधकाम युद्ध स्तरावर सुरू केल्याने रविवार (ता.26 जुलै) सकाळपासून वाहतूक सुरू होणार असल्याचे शनिवार (ता.25 जुलै)ला संबंधित रस्त्याचे कंत्राटदाराचे सुपरवायझर शबीर मडावी यांनी दुपारी तीनच्या दरम्यान प्रत्यक्ष स्थळावर भेट देऊन विचारपूस केली असता सांगितले व त्यांनी सांगितल्यानुसार अखेर रविवार (ता. 26 जुलै) ला सकाळपासून वाहतूक सुरू झालेली आहे. त्यामुळे युद्ध पातळीवर काम करून वाहतूक सुरू करणाऱ्या या रस्त्याचे कंत्राटदार सनरायझर्स कन्स्ट्रक्शन कंपनी च्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या चारचाकी, दुचाकीधारक नागरिकांसह शेतकऱ्यांनी आभार मानले. अरोली ते मौदा दरम्यान तयार होणाऱ्या या रस्त्याचे अरोली – पार्डिकला -निमखेडा -भेंडाळा- आजनगाव या अंदाजे 14 ते 15 किलोमीटर रस्त्याचे सिमेंटकरण जवळपास पूर्ण झाल्याने व हा खडबडीत अरुंद असणारा रस्ता गुळगुळीत रुंद झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढलेली आहे, हे विशेष !

Popular Articles