नागपूर :- शिवसेना वाहतूक सेनेच्या शहराध्यक्षपदी राजेंद्र (राजन) छोटेलाल टाकभवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख गौरव रामकुमार गुप्ता यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. ही नियुक्ती शिवसेना नेते तथा विधान परिषद आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, युवासेना सचिव शुभम नवले आणि वाहतूक सेना विदर्भ अध्यक्ष राहुल उके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी नवनियुक्त शहराध्यक्ष राजेंद्र (राजन) टाकभवरे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच वाहतूक सेनेचे कार्य शहरातील प्रत्येक विभागापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नियुक्ती प्रसंगी सोशल मीडिया पूर्व विदर्भ अध्यक्ष योगेश पौनिकर, युवासेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख आकाश पांडे, सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ शिवसैनिक निरंजन दहीवले, नंदकिशोर माटे, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख अभिषेक थुल, एजाज अन्सारी, मंगेश दुबे, आकाश गुप्ता, विनीत पांडे, येशु कोल्टे तसेच शिवसेना वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त शहराध्यक्ष राजेंद्र (राजन) टाकभवरे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
शिवसेना वाहतूक सेनेच्या शहराध्यक्षपदी राजेंद्र (राजन) टाकभवरे यांची नियुक्ती









