spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाकाली नगर हनुमान मंदिर परिसरात उत्साहात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

नागपूर :- महाकाली नगर -१ येथील हनुमान मंदिर परिसरात रविवारी सामाजिक कार्यकर्ते आशिष काळे यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाला वस्तीतील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमा दरम्यान विविध प्रकारची वृक्षलागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्थानिक नागरिकांनी स्वीकारली. यावेळी उपस्थितांनी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. सामाजिक कार्यकर्ते आशिष काळे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करत, स्वच्छ व हरित परिसर घडविण्यासाठी नागरिकांनी सातत्याने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या वृक्षारोपण उपक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून, स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत केले.

Popular Articles