spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

करंभाड येथे चुलत भावाने केला भावाचा खून

– पारशिवनी पोलीस ठाण्या अंतर्गत करंभाड येथील घटना.

पारशिवनी :-पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम करंभाड येथे चुलत भावाने भावाच्या डोक्यात जाड वस्तूने प्रहार करून जखमी गेले यावेळी आरोपी व व मृतक दारूच्या नशेत होते.

आरोपी विनोद पांडुरंग लोहकरे वय ५२ रा.करंभाड.मृतक गोलू उर्फ प्रशांत लोहकरे वय ३५ रा करंभाड आरोपी व मृतक ते नात्यांमध्ये एकमेकांचे चुलत भाऊ आहेत पण दोघेही नेहमी दारू पिऊन धिंगाणा घालत असे घटनेच्या दिवशी दिनांक १२/१०/२५ च्या रात्री ९ च्या सुमारात दोघेही दारूच्या नशेत असताना आरोपी विनोद पांडुरंग लोहकरे यांनी गोलू उर्फ प्रशांत लोहकरे यांच्या डोक्यावर व छातीवर कसल्या तरी जाळ वस्तूने प्रहार केले या हल्ल्यात गोलू जखमी झाला त्याला ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे उपचार करता दाखल करण्यात आले पण परिस्थिती बिघडत असताना त्याला उपचारार्थ नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले उपचारादरम्यान आज दिनांक १३/१०/२५ ला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

फिर्यादी राजकुमार मारोतराव लोहकरे वय ५६ यांच्या तक्रारीवरून पारशिवनी पोलिसांनी अपराध क्रमांक ४८९/२५ कलम १०९/१ ३५१/३ भारतीय न्याय सुविधा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे व आरोपीस अटक केलेली आहे.

घटनास्थळी उपाधीक्षक नागपूर ग्रामीण मस्के व उप विभागीय अधिकारी रमेश बरकते ठाणेदार राजेश कुमार थोरात व पोलीस कर्मचारी दाखल झाले व पुढील तपास पोलीस व पोलीस उपनिरीक्षक रामराव पवार व विरेन्दसिंह चौधरी , पृथ्वीराज चौहान व पोलिस कर्मचारी करीत आहे.

Popular Articles