रामटेक :- रामटेक पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा परसोडा, महाकाल दुध डेअरीच्या मागे काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचले असता, नमुद घटनास्थळी काही इसम ५२ ताशपत्त्यांचा जुगार खेळताना दिसुन आले. पोलीसांनी आरोपी नामे १) गजानन फजितराव साठवणे, वय ४४ वर्ष, रा. परसोडा, ता. रामटेक, २) नरेंद्र रामचंद्र कामडी, वय ४२ वर्षे, रा. वार्ड क्र. ४ नगरधन, ता. रामटेक, जि. नागपुर ३) पिंटु रामदास चांदेकर, वय ४० वर्ष, रा. भोजापुर, ता. रामटेक, जि. नागपुर ४) प्रेम रूपचंद मारबते, वय ३५ वर्ष, रा. परसोडा, ता. रामटेक, जि. नागपुर ५) ओमसिंग नारायण उईके, वय ५४ वर्ष, रा. परसोडा, ता. रामटेक, जि. नागपुर ६) ज्ञानेश्वर सुखदेव पानतावणे, वय ५४ वर्ष, रा. पत्रई, ता. रामटेक, जि. नागपुर ७) कैलाश कृष्णा चव्हाण, वय ५४ वर्ष, रा. शितलवाडी, ता. रामटेक, जि. नागपुर यांना जागीच पकडले. पोलीसांनी घटनास्थळावरून ५२ तास पत्ते आणि रोख रक्कम ६,५५०/- रूपये असा एकुण ६५५०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद ०७ आरोपीतांविरूद्ध पोलीस स्टेशन रामटेक येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
५२ पत्त्यांच्या जुगारात खेळणाऱ्या ७ जणांवर गुन्हा
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.