spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सात दिवस उलटूनही चेकची रक्कम जमा होत नसल्याने बँक ऑफ इंडिया शाखा कोदामेंढीचे ग्राहक त्रस्त 

किशोर साहू, मौदा, ता. १३ :- बँक ऑफ इंडिया शाखा कोदामेंढी येथील ग्राहकांचे बँक ऑफ इंडिया व्यतिरिक्त इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांचे चेक मागील सात दिवसापूर्वी पासून खात्यात जमा होत नसल्याने व दिवाळीपूर्वीच असा प्रकार सुरू झाल्याने येथील खातेदार कमालीचे त्रस्त आहेत. याबाबत येथील बँकेच्या अधिकारी गायकवाड यांना शुक्रवार (दि. 10 ऑक्टोबर)ला बँकेत विचारपूस केली असता याच शाखेत नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वच बँकेच्या शाखेत सात दिवसापूर्वीपासून काही टेक्निकल समस्या निर्माण झाल्याने, ही समस्या उद्भवल्याचे त्यांनी सांगितले व इतर बँकेचे खात्यात चेक जमा होण्यास आणखी विलंब होणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

संबंधित वरिष्ठ अधिकारी व प्रशासन विभागाने दिवाळीपूर्वी उद्भवलेल्या या गंभीर समस्येला तात्काळ सोडून बँकेच्या ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी बँकेच्या खातेदारांनी केली आहे.

Popular Articles